*कोंकण एक्सप्रेस*
*मोफत प्रशिक्षण शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
वेंगुर्ला भाजपा महिला मोर्चातर्फे आणि भाजपा युवा नेते विशालभाई परब पुरस्कृत महिलांसाठी आयोजित केलेल्या मोफत हस्तकौशल्य प्रशिक्षण शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी सहभागी महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या शिबिरात चिपळूण येथील उमा म्हाडदळकर यांनी महिलांना मोत्यांचे दागिने बनविणे, फॅब्रिक ज्वेलरी तयार करणे, मोत्यांचे महिरप बनविणे, मॅट रांगोळीचे प्रशिक्षण आणि काथ्यापासून फॅन्सी वस्तू तयार करणे याबाबत प्रशिक्षण दिले. समारोपप्रसंगी महिलांनी प्रशिक्षणादरम्यान तयार केलेल्या वस्तूंचे आकर्षक प्रदर्शन मांडले. उपस्थितांनी या कलाकृतींचे कौतुक करत महिलांच्या कल्पकतेचे आणि मेहनतीचे विशेष अभिनंदन केले.
यावेळी भाजपाच्या अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, जिल्हा उपाध्यक्ष वृंदा गवंडळकर, श्रेया मयेकर, चेतना रजपूत, डॉ.पूजा कर्पे, वैभवी मालवणकर, आकाक्षां परब, कृपा मोंडकर, साक्षी पेडणेकर, प्रार्थना हळदणकर, रसिका मठकर, हसीनाबेन मकानदार, ज्योती देसाई आदी उपस्थित होत्या.

