कुणकवळे येथील श्री दुर्गादेवीचा शनिवारी जत्रोत्सव

कुणकवळे येथील श्री दुर्गादेवीचा शनिवारी जत्रोत्सव

*कोंकण एक्सप्रेस*

*कुणकवळे येथील श्री दुर्गादेवीचा शनिवारी जत्रोत्सव*

*मालवण (प्रतिनिधी)*

मालवण तालुक्यातील कुणकवळे येथील श्री दुर्गादेवीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार दि. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

भक्ताच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी ख्याती असणाऱ्या कुणकावळे येथील श्री दुर्गादेवीच्या वार्षिक जत्रोत्सवास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. शनिवारी दुपारी २ वाजता श्री दुर्गादेवीची मानकऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजा करून खण नारळाची ओट्या भरल्यानंतर भाविकांच्या दर्शनाचा व ओट्या भरण्याच्या कामास सुरुवात होणार आहे रात्री पावणेबारा वाजता पालखी सोहळ्यास सुरुवात होणार असून त्यानंतर बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे. तरी या उत्सवाचा व देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दुर्गादेवी देवस्थान मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!