*कोंकण एक्सप्रेस*
*विभागीय ज्युदो स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि.कॉलेज फोंडाघाटचे सुयश*
*फोंडाघाट : प्रतिनिधि*
क्रीडा व युवक सेवा संचलणाय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली द्वारा आयोजित विभागीय ज्युदो स्पर्धा दिनांक 04 व 05 नोव्हेंबर 2025 रोजी शांतीनिकेतन विद्यापीठ ,सांगली येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, फोंडाघाटच्या पुढील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
I)14 वर्ष वयोगट मुली
कु.कृष्णाई नंदकिशोर रावराणे.
(44 किलो वजनी गट-कांस्य पदक)
II) 17 वर्ष वयोगट मुले
आकाश अपन्ना गोंधळी
(66 किलो वजनी गट-कांस्य पदक)
यशस्वी विद्यार्थी आणि प्रशिक्षक श्री.ए.व्ही.पोफळे यांचे फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री.म.ज.सावंत, सेक्रेटरी श्री.चं.शा.लिंग्रस, खजिनदार श्री.वि.रा.तायशेटे शाळा समिती चेअरमन श्री.द.दि.पवार तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.पी.के.पारकर, पर्यवेक्षक श्री.व्ही.पी.राठोड, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी हार्दिक-हार्दिक अभिनंदन केले.

