काकड आरती सोहळ्याची सांगता

काकड आरती सोहळ्याची सांगता

*कोंकण एक्सप्रेस*

*काकड आरती सोहळ्याची सांगता*

*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*

वेंगुर्ला शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये गेले महिनाभर सुरू असलेल्या काकडी आरती सोहळ्याची सांगता आज त्रिपुरारी पौर्णिमेला बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत झाली.
शहरातील बाजारपेठ विठ्ठल मंदिर, भुजनागवाडी विठ्ठल मंदिर आणि दाभोसवाडी विठ्ठल मंदिरात कोजागिरी पौर्णिमेच्या दुस-या दिवशीपासून काकड आरतीला प्रारंभ झाला होता. महिनाभर रोज पहाटे ५.३० ते ७ वाजेपर्यंत शेकडो भाविकांच्या उपस्थितीत काकड आरती संपन्न होत होती. त्यामुळे शहरात पहाटे मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, महिनाभर सुरू असलेल्या या काकड आरती सोहळ्याची सांगता आज बुधवारी झाली. काकड आरती पार पडल्यानंतर दाभोसवाडा विठ्ठल मंदिराभोवती विठ्ठल रखुमाईची पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!