महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी सैनिक पतसंस्थेचे आणखी एक पाऊल

महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी सैनिक पतसंस्थेचे आणखी एक पाऊल

*कोंकण एक्सप्रेस*

*महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी सैनिक पतसंस्थेचे आणखी एक पाऊल*

वेंगुर्ले ः प्रतिनिधी*

भाजपा महीला मोर्चा , वेंगुर्ला व युवा नेते विशालभाई परब यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या महीलांसाठी मोफत प्रशिक्षणाचे औचित्य साधत वेंगुर्लातील महिला व युवतींना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी सैनिक पतसंस्थेने युवा स्वावलंबी व वीरांगना ह्या दोन कर्ज योजनांची माहिती संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मा.श्री.सुनिल राऊळ साहेब यांनी दिली.ह्या योजनांच्या आधी संस्थेने हिरकणी महिला कर्ज योजना आणली होती त्या योजनेला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि म्हणूनच संस्थेने विरांगना व युवा स्वावलंबी या दोन कर्ज योजना सुरू केल्या आहेत. या कर्ज योजनांचा महिलांनी लाभ घेऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम बनावं.असे आवाहन मा.मुख्यकार्यकारी अधिकारी श्री.सुनिल राऊळ यांनी केले.
यावेळी संस्थेचे चेअरमन मा.श्री.बाबुराव कवीटकर साहेब यांनी महिलांनी प्रशिक्षण घेऊन स्वःताच्या पायावर उभे राहण्यासाठी सैनिक पतसंस्थेच्या कर्ज योजनांचा लाभ घ्यावा व आत्मनिर्भर बनावे असे प्रतिपादन केले .
यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.श्वेताताई कोरगावकर व महिला मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते .सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाखा व्यवस्थापक सौ.ज्योती देसाई यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!