वेंगुर्ला येथे ७ रोजी दिव्यांगांसाठी शिबीर

वेंगुर्ला येथे ७ रोजी दिव्यांगांसाठी शिबीर

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ला येथे ७ रोजी दिव्यांगांसाठी शिबीर*

*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*

वेंगुर्ला तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांचे युडीआयडी कार्ड काढून घेणेसाठी तसेच लाभार्थी पडताळणीसाठी शुक्रवार दि. ७ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला येथील उपजिल्हा रूग्णालयात शिबिराचे आयोजन केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांजकडून संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनांतून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अर्थसहाय्य वितरीत करण्यात येते. सदर योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे अनुदान हे यापूर्वी प्रतिमाह रु. १५००/- एवढे होते, ते आता प्रतिमाह रु.२५००/- एवढे करण्यात आलेले आहे.

वेंगुर्ला तालुक्यात एकूण ५५७ दिव्यांग लाभार्थी हे या योजनेचा लाभ घेत आहेत. या पैकी ३५२ कार्ड असलेले लाभार्थी असून तर २०५ कार्ड नसलेले दिव्यांग लाभार्थी आहेत. केंद्र शासनाच्या धर्तीवर दिव्यांगत्वासंदर्भातील सर्व लाभ मिळविण्यासाठी वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी) बंधनकारक करणेत आलेले आहे. तसेच सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची पडताळणी करून त्यांची पात्र/अपात्रता तपासणी करण्याच्या शासनाच्या सुचना आहेत. त्यांनुसार तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी युडीआयडी कार्ड काढून घेणे व इतर लाभार्थी यांनी देखील शिबिराचे दिवशी उपस्थित राहून आपलेकडील युडीआयडी कार्डची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे.

या करिता शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांचेशी समन्वय साधून जिल्हा प्रशासन व जिल्हा शल्यचिकित्सक सिंधुदुर्ग यांनी संयुक्तरीत्या तालुका स्तरावर ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते ६ या वेळेत वेंगुर्ला उपजिल्हा रूग्णालयात शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

ज्या लाभाथ्यांकडे युडीआयडी कार्ड नाही अशा लाभार्थ्यांची नोंदणी पोर्टलवर होणे आवश्यक आहे. तरी त्या अनुषंगाने शासनाच्या www.swavlambancard.gov.in या वेबसाईटवर फॉर्म भरणे आवश्यक आहे. हा फॉर्म लाभार्थी यांनी जवळच्या महा ई सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायत कार्यालयात जावून भरून घ्यावा.

संबंधित फॉर्म भरण्यासाठी पुढील आधारकार्ड, रेशनकार्ड, फोटो आदी आवश्यक आहेत. तरी ज्या लाभार्थ्यांनी अद्यापी आपले युडीआयडी कार्ड काढलेले नाही त्यांनी कृपया वरील वेबसाईटवर नोंदणी करून त्याची पावती घेऊन शिबिराचे नमूद ठिकाणी वेळीच उपस्थित राहून आपले युडीआयडी कार्ड काढून घ्यावेत. तसेच उर्वरित लाभार्थ यांनी आपलेकडील युडीआयडी कार्डची पडताळणी देखील करून घ्यावी. या शिबिराचा लाभ वेंगुर्ला तालुक्यातील सर्व दिव्यांगांनी घ्यावा असे आवाहन वेंगुर्ला तहसीलदार ओंकारी ओतारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!