हस्तकौशल्य शिबिरातून आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग खुला-श्वेता कोरगांवकर

हस्तकौशल्य शिबिरातून आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग खुला-श्वेता कोरगांवकर

*कोंकण एक्सप्रेस*

*हस्तकौशल्य शिबिरातून आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग खुला-श्वेता कोरगांवकर*

*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*

महिलांना आत्मनिर्भर बनविणे हिच खरी समाजसेवा आहे. विशालभाई परब यांच्या पुढाकारामुळे वेंगुर्ल्यात अशाप्रकारच्या प्रशिक्षण उपक्रमांना नवी दिशा मिळाली आहे. हे शिबिर महिलांना घरबसल्या रोजगाराचे कौशल्य शिकवून आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग खुला करेल असे प्रतिपादन महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर यनी केले.

भाजपा महिला मोर्चा वेंगुर्लातर्फे ३ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत साई मंगल कार्यालयात महिलांसाठी मोफत हस्तकौशल्य प्रशिक्षण आयोजित केले आहे. याचे उद्घाटन महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगांवकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अॅड.सुषमा प्रभूखानोलकर व वृंदा गवंडळकर, तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, उमा फॅशन इन्स्टिट्यूट चिपळूणच्या संचालिक व प्रशिक्षक उमा म्हाडदळकर, शहर अध्यक्ष श्रेया मयेकर, तालुका चिटणीस चेतना राजपूत, माजी नगराध्यक्ष डॉ.पूजा कर्पे, अणसूर उपसरपंच वैभवी मालवणकर, आकांक्षा परब, प्रार्थना हळदणकर, रसिका मठकर, माजी नगरसेवक कृपा मोंडकर, साक्षी पेडणेकर आदी उपस्थित होते. शिबिरात महिलांना मोत्यांचे दागिने बनविणे, फॅब्रिक ज्वेलरी तयार करणे, मोत्यांचे महिरप बनविणे, मॅट रंगोळीचे प्रशिक्षण आणि काथ्यापासून फॅन्सी वस्तू तयार करणे याबाबत प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे उमा म्हाडदळकर यांनी सांगीतले. सैनिक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन बाबूराव कविटकर, व्यवस्थापक सुनील राऊळ व शाखा व्यवस्थापक ज्योती देसाई यनी महिलांना मार्गदर्शन केले. शिबिरातील सहभागींना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!