तुलसी विवाहाला पावसाचे विघ्न

तुलसी विवाहाला पावसाचे विघ्न

*कोंकण एक्सप्रेस*

*तुलसी विवाहाला पावसाचे विघ्न*

*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*

– वेंगुर्ला तालुक्यासह शहरात रविवारपासून तुलसी विवाहाला प्रारंभ झाला आहे. पहिल्या दिवशी काही ठिकाणी तुलसी विवाह थाटात संपन्न झाले. दरम्यान, आज या तुलसी विवाहाला पावसाने हजेरी लावील. त्यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली.

कार्तिक शुद्ध द्वादशीला घरासमोरील असणाऱ्या तुलसी वृंदावनाचा विवाह करण्याची प्रथा आहे. त्यानुसार रविवारपासून विवाह समारंभ सुरू झाले आहेत. रविवारी आठवडा बाजारात नागरिकांनी तुलसी विवाहाला लागणाऱ्या साहित्याची खरेदी केली. रविवारी पावसाच्या व्यक्तयाअभावी काही तुलसी विवाह संपन्न झाले. तर सोमवारी ऐन तुलसी विवाहाला पावसाने हजेरी लावल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. छत्रीचा आधार घेत तुलसी विवाह पार पाडावे लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!