महामार्गावर लाखोंची दारुवाहतूक रोखली

महामार्गावर लाखोंची दारुवाहतूक रोखली

कोकण Express*

*महामार्गावर लाखोंची दारुवाहतूक रोखली*

*कणकवली पोलिसांची कारवाई*

*आयशर टेम्पोसह मुद्देमाल जप्त*

*कणकवली ः प्रतिनिधी*

गोव्याहून मुंबईच्या दिशेने आयशर टेम्पोमधून सुरु असलेली दारु वाहतूक कणकवली पोलिसांनी पकडली. ही कारवाई महामार्गावरील ओसरगांव येथील टोलनाक्यानजीक रविवारी रात्री 2.30 वा. सुमारास करण्यात आली. यात 9 लाख रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली.
पेट्रोलिंग करत असताना गोव्याहून मुंबईच्या दिशेने आयशर टेम्पोमधून दारूवाहतूक सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार ओसरगांव टोलनाका येथे रात्री 2.30 वा. सुमारास मुंबईच्या दिशेने जात असलेला आयशर टेम्पो (जीजे06 एक्स7898) पोलिसांनी थांबवला. मात्र चालक व क्लिनर टेम्पोमधून उतरून अंधाराचा फायदा घेऊन पळाले. पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता हौद्यात पुठ्ठय़ांच्या मधोमध दारूच्या बाटल्यांचे बॉक्स आढळून आले.
9 लाखांची दारू जप्त
2 लाख 68 हजार 800 रुपयांच्या जस्टर ग्रीन प्रिमियरच्या 336 बाटल्या, 3 लाख 3 हजार 600 रुपयांच्या जेलीडस प्रिमीयम व्होडकाच्या 276 बाटल्या, 3 लाख 16 हजार 800 रुपयांच्या जस्टर ऑरेंज फ्लेव्हर व्होडकाच्या 396 बाटल्या असा मिळून 8 लाख 89 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल तसेच 7 लाख रुपयांचा आयशर टेम्पो पोलिसांनी जप्त केला.
कारवाईमध्ये सहाय्यक निरीक्षक बापू खरात, शिवाजी सावंत, राजेश उबाळे, कॉन्स्टेबल रुपेश गुरव, नितीन बनसोडे, होमगार्ड पवार आदी सहभागी झाले होते. फिर्याद कॉन्स्टेबल नितीन बनसोडे यांनी दिली. त्यानुसार अनोळखी संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!