कुंभारमाठ येथील फुल विक्रेत्याची गळफास लावून आत्महत्या

कुंभारमाठ येथील फुल विक्रेत्याची गळफास लावून आत्महत्या

*कोंकण एक्सप्रेस*

*कुंभारमाठ येथील फुल विक्रेत्याची गळफास लावून आत्महत्या*

*मालवण (प्रतिनिधी*

मालवण कुंभारमाठ फोंडेकरवाडी येथील रहिवासी आणि मालवणच्या बाजारपेठेत सकाळच्या वेळी फुलांची विक्री करणारे चंद्रकांत वसंत फोंडेकर ( वय ६५) यांनी घरासमोरील जागेत चाफ्याच्या झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

दरम्यान चंद्रकांत फोंडेकर यांनी नैराश्येतून ही आत्महत्या केल्याचे चिठ्ठीत लिहून ठेवल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

याबाबत मालवण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून मालवणचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकोंस्टेबल पेडणेकर हे अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!