*कोंकण एक्स्प्रेस*
*वायरी भूतनाथ येथे ५ रोजी रंगभूमी दिन*
*मालवण (प्रतिनिधी)*
वायरी भूतनाथ येथील भूतनाथ नूतन नाट्य समाज या नाट्य मंडळातर्फे श्री. प्रदीप वेंगुर्लेकर यांच्या निवासस्थानी मराठी रंगभूमी दिन सोहळा दि. ५ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. यावेळी सायंकाळी ७ वाजता नटराज मूर्तीचे पूजन करण्यात येणार आहे. तरी नाट्यप्रेमींनी उपस्थित राहवे, असे आवाहन करण्यात आले आहे.

