गवाणकर व कदम यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मालवणात ५ रोजी शोकसभा

गवाणकर व कदम यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मालवणात ५ रोजी शोकसभा

*कोंकण एक्सप्रेस*

*गवाणकर व कदम यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मालवणात ५ रोजी शोकसभा*

*मालवण (प्रतिनिधी)*

ज्येष्ठ नाटककार, मालवणी भाषेला मराठी रंगभूमीवर ओळख निर्माण करून देणारे, ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर व ज्येष्ठ दिग्दर्शक रघुनाथ कदम यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अष्टपैलू कलानिकेतन, मालवणतर्फे दि. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मालवण भरड येथील श्री दत्त मंदिर येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

गंगाराम गवाणकर तथा नाना व रघुनाथ कदम यांच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टीची मोठी हानी झाली आहे. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित या या शोकसभेला सर्वांनी उपस्थित राहवे, असे आवाहन अष्टपैलू कलानिकेतनचे अध्यक्ष बुवा भालचंद्र केळुसकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!