युवासेना मालवण शहर संघटकपदी ऋषिकेश सामंत यांची नियुक्ती

युवासेना मालवण शहर संघटकपदी ऋषिकेश सामंत यांची नियुक्ती

*कोंकण एक्सप्रेस*

*युवासेना मालवण शहर संघटकपदी ऋषिकेश सामंत यांची नियुक्ती*

*मालवण (प्रतिनिधी)*

शिवसेनेच्या युवासेना मालवण शहर संघटक पदी ऋषिकेश दत्तप्रसाद सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांनी ही नियुक्ती केली. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र ऋषिकेश सामंत यांना सुपूर्द करण्यात आले.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, शिवसेना शहरप्रमुख दीपक पाटकर, शिवसेना जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, युवासेना जिल्हा सचिव निशय पालेकर, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, अभि लाड यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!