मालवण वीज कार्यालयातील बिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याची पालकमंत्र्यांकडून सूचना- बाबा मोंडकर यांची माहिती

मालवण वीज कार्यालयातील बिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याची पालकमंत्र्यांकडून सूचना- बाबा मोंडकर यांची माहिती

*कोंकण एक्सप्रेस*

*मालवण वीज कार्यालयातील बिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याची पालकमंत्र्यांकडून सूचना- बाबा मोंडकर यांची माहिती*

*मालवण : (प्रतिनिधी)*

वीज महावितरण कंपनीच्या मालवण कार्यालयात सुरु असलेले वीज बील भरणा केंद्र कॅशिअर अभावी बंद करण्याच्या निर्णयामुळे वीज ग्राहकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. ही बाब भाजप मालवण कडून पालकमंत्री नितेश राणे यांच्या कानी घातल्यानंतर मालवण वीज कार्यालया तील वीज बील भरणा केंद्र सुरु ठेवण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे सोमवार दि. ३ नोव्हेंबर पासून मालवण वीज कार्यालयातील वीज बील भरणा केंद्र पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती भाजप शहर मंडल तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली आहे.

महावितरण मालवण उपविभाग कार्यालयातील वीज बिल भरणा केंद्र बंद झाल्याने मालवण शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिक यांची होणाऱ्या गैरसोयी विषयी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे भाजपा मालवणने लक्ष वेधले असून त्यावर सदर केंद्र सुरु ठेवण्याचा सूचना त्यांनी वीज वितरणास दिल्या आहेत. सोमवार ३ नोव्हेंबर पासून वीज बिल केंद्र सुरु होणार आहे. वीज वितरण अधिकारी श्री. म्हेत्रे यांनीही सदर केंद्र सोमवार पासून सुरु होऊन नागरिकांची गैरसोय दूर होईल, असे सांगितल्याची माहिती बाबामोंडकर यांनी दिली आहे. मालवण भरड येथील देऊलकर मसाले समोर वैश्यवाणी पतसंस्था कार्यालयात देखील वीज बील भरणा केले जाणार असून वीज ग्राहकांनी याठिकाणी अथवा डिजिटल पेमेंट प्रणालीचा उपयोग करून आपले वीज बिल भरणा करावे, असेही श्री. मोंडकर यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!