*कोकण Express*
*विकेंड लॉकडाऊनला कुडाळ बाजारपेठेत उस्फुर्त प्रतिसाद*
*कुडाळ ःःप्रतिनिधी*
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या नविन नियमावली नुसार विकेंड लॉकडाऊनला कुडाळ शहर बाजारपेठांमधून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने शनिवार, रविवार या दोन दिवसीय विकेन्ड लॉकडाऊन ची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचे पालन कुडाळ शहरांच्या वतीने व कुडाळवाशीय तंतोतंत करण्यात येत असल्याचे चित्र कुडाळ शहरांमध्ये पहावयास मिळत आहे.