*कोंकण एक्सप्रेस*
*रेडी येथे ५३ जणांचे रक्तदान*
*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*
नाईकवस मित्रमंउळ गेली चार वर्षे सामाजिक बांधिलकी जपून रक्तदानासारखे पवित्र कार्य केले आहे. त्यांचा हा उपक्रम स्त्युत्य आहे. भविष्यातही असे समाजपयोगी उपक्रम राबवावेत असे प्रतिपादन सरपंच रामसिग राणे यांनी रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले.
दीपावली शो टाईमचे औचित्य साधून रेडी येथील श्री देव नाईकवस मित्रमंडळ, गावतळेवाडी ग्रामस्थ आणि गोवा-बांबुळी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने गावतळेवाडी प्राथमिक शाळेत रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण ५३ दात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन सरपंच रामसिग राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसरपंच आनंद भिसे, माजी उपसरपंच नामदेव राणे, राजेंद्र राणे, विनोद राणे, डॉ.रूजारिओ पास्कोल, श्रीमती सिद्धी, पोलिस पाटील सूमित राणे, मंडळाचे अध्यक्ष भगवान राणे, आबा राणे, सागर राणे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मंडळातर्फे सर्व रक्तदात्यांचे आभार मानण्यात आले.

