*कोकण Express*
*फोंडाघाटात “विकेंड लाॅकडाऊन” ला अभूतपूर्व प्रतिसाद*
*फोंडाघाटात “विकेंड लाॅकडाऊन” ला अभूतपूर्व प्रतिसाद*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
शनिवार-रविवार शासनाच्या आदेशाप्रमाणे फोंडा बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय “वीकेंड लॉकडाउन” करिता कडकडीत बंद ठेवून अभूतपूर्व प्रतिसाद दिला. व्हाट्सअप वरून सोमवारी आठवडा बाजार बंद ठेवण्याची विनंती ग्रामविस्तार अधिकारी व सरपंच यांनी केल्याच्या संदेशानंतर व्यापाऱ्यांनी मनापासून बंद पाळला. व्यापारी संघ अध्यक्ष स्वर्गीय सुदन बांदिवडेकर यांच्या प्रशासकीय निर्णयाच्या अंमलबजावणीचा आग्रह सर्वांनाच आजच्या बाजरपेठ बंदच्या निमित्ताने आठवण करून देत होता. नेहमीची ठराविक दुकाने एक फळी उघडून तर रिक्षा, सिक्ससीटरची तुरळक वाहतूक, दुचाकीस्वार यांची अवचित फेरी रस्त्यावरून होती. ऑफिसेस, खोकेधारक, कोल्ड्रिंक, हॉटेल, भाजी, भुसारी, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, बेकरी इतर सर्व व्यवहार कडकडीत बंद होते. मेडिकल, दवाखाने, पार्सल सेवा सुरू होती. त्यामुळे रस्त्यावर तुरळक वाहने, माणसे फिरताना दिसत होती. चौका- चौकातील कट्ट्यावरची हौसे-गवसे यांची कट्टा बैठक निर्मनुष्य असल्याने सुनसान होती. एकंदरीत सर्वांच्या सहकार्यामुळे प्रशासनावरील बंदोबस्ताचा भार कमी दिसत होता.