मालवण तारकर्ली देवबाग एसटी बस फेऱ्या पूर्ववत सुरू -वैभव सावंत यांच्या  पाठपुरव्याला  यश

मालवण तारकर्ली देवबाग एसटी बस फेऱ्या पूर्ववत सुरू -वैभव सावंत यांच्या  पाठपुरव्याला  यश

*कोंकण एक्सप्रेस*

*मालवण तारकर्ली देवबाग एसटी बस फेऱ्या पूर्ववत सुरू -वैभव सावंत यांच्या  पाठपुरव्याला  यश*

*मालवण दि प्रतिनिधी*

पर्यटन हंगामात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे मालवण तारकर्ली देवबाग मार्गावरील एसटी बस सेवा प्रशासनाकडून बंद करण्यात आली होती. दरम्यान या मार्गावर एसटी सेवा पूर्वरस सुरू व्हावी यासाठी आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव सावंत यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार या मार्गावरील एसटी बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.

आज गुरुवार 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी मालवण तारकर्ली एसटी बसफेरी सुरु होत आहे. तसेच शुक्रवार 31 ऑक्टोबर पासून मालवण तारकर्ली देवबाग एसटी बस फेऱ्या पूर्ववत सुरू होणार आहे. अशी माहिती मालवण एसटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 31 ऑक्टोबर पासून शाळा ही पुन्हा सुरु होत असून विध्यार्थी वर्गासह सर्वांनाच या एसटी फेऱ्यांचा लाभ होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!