*कोकण Express*
*लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बांदा बाजारपेठेत कडकडीत बंद ..*
*बांदा ः प्रतिनिधी*
विकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बांदा शहरात कडकडीत अंमलबजावणी करण्यात आली. दवाखाने, मेडिकल स्टोअर्स, किराणा मालाची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. बाजारपेठ बंद असल्याने शहरात सर्वत्र शुकशुकाट होता. शहरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.