युथ फोरमच्या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेला कुडाळ-मालवणचे आमदार श्री. निलेशजी राणे व शिवसेना उपनेते श्री. संजयजी आग्रे यांची सदिच्छा भेट

युथ फोरमच्या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेला कुडाळ-मालवणचे आमदार श्री. निलेशजी राणे व शिवसेना उपनेते श्री. संजयजी आग्रे यांची सदिच्छा भेट

*कोंकण एक्सप्रेस*

*युथ फोरमच्या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेला कुडाळ-मालवणचे आमदार श्री. निलेशजी राणे व शिवसेना उपनेते श्री. संजयजी आग्रे यांची सदिच्छा भेट*

*देवगड ः प्रतिनिधी*

देवगड तालुक्यात आयोजित युथ फोरमच्या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेला कुडाळ-मालवणचे आमदार माननीय निलेशजी राणे आणि शिवसेना उपनेते श्री. संजयजी आग्रे यांनी सदिच्छा भेट देत उपस्थित तरुणांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात आमदार निलेशजी राणे यांनी तरुणाईच्या कार्याची प्रशंसा करत सांगितले की, “देवगडमधील युवकांमध्ये अपार कला आणि नेतृत्वगुण आहेत. या उर्जेला योग्य दिशा मिळाली तर ते समाज परिवर्तनाचे शिल्पकार ठरतील. तरुणांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन हवे असल्यास शिवसेना हीच खरी ताकद आहे.”
यावेळी शिवसेना उपनेते श्री. संजयजी आग्रे यांनीही तरुणांना संघटन, शिस्त आणि समाजसेवा या तीन तत्त्वांवर आधारित कार्य करण्याचे आवाहन केले. त्यांनी तरुणाईला शिवसेनेच्या विचारधारेत सहभागी होऊन जनतेसाठी कार्य करण्याचे प्रेरणादायी मार्गदर्शन दिले.
कार्यक्रमाला श्री. संदेश सावंत पटेल, तालुकाप्रमुख श्री. विलास साळसकर, नगराध्यक्ष सौ. साक्षी प्रभू, अमोल लोके तसेच युथ फोरमचे पदाधिकारी आणि अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राणे यांनी उपस्थित सर्व तरुणांचे कौतुक करत सांगितले की, “स्थानिक तरुण समाज, कला आणि संस्कृती या तिन्ही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. हीच खरी देवगडची ताकद आहे.”
कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रणव नलावडे, सागर गावकर, श्रुती मणगावकर, ओंकार सारंग, आजा कोयडे, दयानंद पाटील, वैभव करंगुटकर आदी युवकांनी आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!