*कवी मंगेश तांबे यांच्या काव्य संग्रहांचा तळेरे येथे गुरूवारी 30 आॅक्टोंबर रोजी प्रकाशन सोहळा*

*कोंकण एक्सप्रेस*

*कवी मंगेश तांबे यांच्या काव्य संग्रहांचा तळेरे येथे गुरूवारी 30 आॅक्टोंबर रोजी प्रकाशन सोहळा*

*कासार्डे : संजय भोसले*

हळवल गावचे रहिवाशी कलाशिक्षक, कवी श्री. मंगेश तांबे यांच्या “ती” आणि “हुंकार” अशा दोन काव्य संग्रहांचा प्रकाशन सोहळा आज (गुरुवार, दि. 30 ऑक्टोबर 2025) सायंकाळी 4 वाजता तळेरे येथील स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयात (एस. टी. स्टँड च्या बाजूला) आयोजित करण्यात आलेला आहे. हा प्रकाशन सोहळा स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाने आयोजित केला असून या प्रकाशन सोहळ्याला वाचक रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या काव्य संग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध मालवणी कवी प्रा. डॉ. नामदेव गवळी यांच्या हस्ते होणार असून यावेळी तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष चंद्रकांत तळेकर, वाचनालयाचे अध्यक्ष राजू वळंजू आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी वाचनालयाचे यावर्षी खरेदी केलेल्या दिवाळी अंकांचे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाला रसिक वाचकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाचे सचिव मिनेश तळेकर यांनी केले आहे.

*कवी मंगेश तांबे यांच्या काव्य संग्रहांचा तळेरे येथे गुरूवारी 30 आॅक्टोंबर रोजी प्रकाशन सोहळा*

*कासार्डे प्रतिनिधी: संजय भोसले.*
हळवल गावचे रहिवाशी कलाशिक्षक, कवी श्री. मंगेश तांबे यांच्या “ती” आणि “हुंकार” अशा दोन काव्य संग्रहांचा प्रकाशन सोहळा आज (गुरुवार, दि. 30 ऑक्टोबर 2025) सायंकाळी 4 वाजता तळेरे येथील स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयात (एस. टी. स्टँड च्या बाजूला) आयोजित करण्यात आलेला आहे. हा प्रकाशन सोहळा स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाने आयोजित केला असून या प्रकाशन सोहळ्याला वाचक रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या काव्य संग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध मालवणी कवी प्रा. डॉ. नामदेव गवळी यांच्या हस्ते होणार असून यावेळी तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष चंद्रकांत तळेकर, वाचनालयाचे अध्यक्ष राजू वळंजू आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी वाचनालयाचे यावर्षी खरेदी केलेल्या दिवाळी अंकांचे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाला रसिक वाचकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाचे सचिव मिनेश तळेकर यांनी केले आहे.

सोबत :
काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ

********
नम्र विनंती आणि सस्नेह निमंत्रण

या कार्यक्रमाला सर्व पत्रकार मित्रांनी उपस्थित रहावे. तसेच, या कार्यक्रमाची प्रसिद्धी करावी, अशी विनंती ट्रस्ट व वाचनालयाकडून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!