*कोकण Express*
*सावंतवाडीत बाजारपेठेत विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद..*
*शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद..*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
शुक्रवार रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ वाजेपर्यंत राज्य शासनाने कडक संचारबंदी जाहीर करत लावलेल्या पहिल्याच मिनी लॉकडाऊनच्या आज पहिल्याच शनिवारी सावंतवाडी शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे.
शहरी भागात पोलीस येणारी जाणारी वाहने अथवा नागरिकांनाही अत्यावश्यक नसल्यास प्रवासास अटकाव करत असून, नाक्या नाक्यावर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. तर स्वॅब टेस्टींग सेंटरवर देखील नागरिकांनी टेस्टींगसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळत आहे.