सरपंच सेवा संघाचे माजी तालुकाध्यक्ष तथा निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांच्या निवेदनाची दखल घेत तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ गोरे बांधावर जात भात शेतीचे केली पाहणी

सरपंच सेवा संघाचे माजी तालुकाध्यक्ष तथा निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांच्या निवेदनाची दखल घेत तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ गोरे बांधावर जात भात शेतीचे केली पाहणी

*कोंकण एक्सप्रेस*

*सरपंच सेवा संघाचे माजी तालुकाध्यक्ष तथा निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांच्या निवेदनाची दखल घेत तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ गोरे बांधावर जात भात शेतीचे केली पाहणी*

*सावंतवाडी प्रतिनिधी*

निगुडे माजी उपसरपंच निगुडे यांनी काल सावंतवाडीतील भात शेतीच्या नुकसानी संदर्भात तालुका कृषी अधिकारी श्री गोरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं होतं त्याची दखल घेत आज तालुका कृषी अधिकारी श्री गोरे यांनी निगुडे भातशेती बांधावर येत पाहणी केली यावेळी बांदा सहाय्यक कृषी अधिकारी श्री. सद्गुरु, निगुडे कृषीअधिकारी पल्लवी सावंत, निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर, माजी सरपंच समीर गावडे, शेतकरी अशोक सावळ, प्रकाश गावडे, शर्मिला नाईक, गुरुदास निगुडकर,पोलीस पाटील सुचिता मयेकर आदी उपस्थित होते यावेळी श्री. गोरे यांनी कृषी अधिकारी पल्लवी सावंत, पोलीस पाटील यांना तातडीने पंचनामे घाला लवकरात लवकर पंचनामे पूर्ण पाहिजे आहेत त्यामुळे ज्या काही त्रुटी असतील त्या योग्य तपासून शेतकऱ्यांना मोबदला मिळाला पाहिजे माझ्या पाहणीवरून भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळे कोम आल्यामुळे अजून चार-पाच दिवस पावसाचं वातावरण असल्यामुळे आपण तातडीने पंचनामे करा व ग्रामपंचायत स्तरावर जी समिती आहे तिला विश्वासात घेऊन सर्वांनी सहकार्य करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासाठी आपण सर्व प्रयत्न करूया असं आवाहन यावेळी त्यांनी दिला तसेच त्यांनी रोणापाल, मडुरा, आदी भागातही भात शेतीची पाहणी केली. यावेळी रोनापाल माजी सरपंच श्री सुरेश गावडे, मडुरा माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वालावलकर, माजी ग्रामपंचायत सदस्य उल्हास परब, मडूरा तलाठी एस आर नाईक , कोतवाल नाना वेंगुर्लेकर रोनापाल ,मडूरा शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!