*कोंकण एक्सप्रेस*
*निलेश राणे साहेबांच्या मागणीला यश..*
*कुडाळ तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय!*
*कुडाळ : प्रतिनिधी*
कुडाळ तालुक्यातील माणगाव खोरे विभागातील 28 गावांमधील हजारो हेक्टर आकारीपड जमिनीचा ताबा अनेक वर्षांपूर्वी शासनाने घेतला होता, ती जमीन आता पुन्हा स्थानिक शेतकऱ्यांना परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्र शासनाने नुकताच जारी केलेल्या नवीन जीआरनुसार —
✅ बाजारमूल्याच्या ५% रक्कम शासनास जमा केल्यास जमीन शेतकऱ्यांना परत दिली जाणार.
✅ जमिनीचा वापर शेती/कृषी उद्देशासाठीच करावा लागेल.
✅ ५ वर्षांपर्यंत जमिनीचा वापर बदलता किंवा विक्री करता येणार नाही.
हा निर्णय कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील स्थानिक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा आहे आणि हे त्यांच्या कष्टाचं, संघर्षाचं फळ आहे, यासाठी कुडाळ मालवणचे आमदार सन्माननीय श्री. निलेश राणे साहेब यांनी महाराष्ट्र सरकार सोबत पाठपुरावा करून माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे. हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे व महसूल राज्यमंत्री श्री. योगेश कदम यांचे मनःपूर्वक आभार तसेच माणगाव खोऱ्यातील सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन.

