*कोकण Express*
*चाफेखोलमध्ये बिबट्याची दहशत…*
*दोन वर्षांच्या पाढीचा फडशा ; वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी…*
*मालवण ः प्रतिनिधी*
चाफेखोल गावात गेले काही दिवसांत बिबट्याने दहशत माजविली आहे. काल रात्री बिबट्याने हल्ला करत दोन वर्षांच्या पाढीला ठार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे सध्या गावात भीतीचे वातावरण आहे.
गेले काही दिवस चाफेखोल गाव परिसरात एका बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बिबट्याच्या मुक्तसंचारामुळे गावात सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. काल या बिबट्याने वस्तीत घुसून सदानंद घाडीगावकर यांच्या मालकीच्या एका दोन वर्षांच्या पाढी हल्ला करत ठार केले. याची माहिती वनविभागास देण्यात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे. या प्रकारामुळे गावात खळबळ उडाली असून अन्य पाळीव प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वनविभागाने तत्काळ उपाययोजना करत या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.