*कोंकण एक्सप्रेस*
*रक्तदान शिबिरात ६२ दात्यांचे रक्तदान*
*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेष गुरव*
वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग – तुळस यांच्यावतीने, कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या भव्य ३३व्या रक्तदान शिबिरात ६२ जणांनी रक्तदान केले.
तुळस येथील श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच रश्मी परब, उपसरपंच सचिन नाईक, मकरंद पाटणकर, कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे प्रथमेश सावंत, ग्रा.पं.सदस्य जयवंत तुळसकर व दादा ठुंबरे, सामाजिक कार्यकर्ते नारायण नागवेकर व सुजाता पडवळ, वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात २० पेक्षा जास्तवेळा रक्तदान केलेल्या २५ रक्तदात्यांचा चषक, शाल आणि श्रीफळ देऊन कोकण कला व शिक्षण विकास संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन परूळकर यांनी तर आभार माधव तुळसकर यांनी मानले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी महेश राऊळ, सदगुरू सावंत, प्रसाद भणगे, मंगेश सावंत, रोहित गडेकर, विधी नाईक, सानिया वराडकर, सुधीर चुडजी, प्रदीप परूळकर, वैष्णवी परूळकर, भक्ती भणगे, सुधीर चुडजी, रोहन राऊळ, नाना राऊळ, यशवंत राऊळ, प्रज्वल परूळकर, अनिल परूळकर, समर्थ तुळसकर आदींनी विशेष मेहनत घेतली

