तळेरे येथील विठ्ठल रखुमाई मंदिराचे भूमिपूजन

तळेरे येथील विठ्ठल रखुमाई मंदिराचे भूमिपूजन

*कोंकण एक्सप्रेस*

*तळेरे येथील विठ्ठल रखुमाई मंदिराचे भूमिपूजन*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

तळेरे गावठण येथील श्री. विठ्ठल रखुमाई मंदिराचा भूमिपूजन सोहळा बुधवार, दि. 22 ऑक्टोबर ला सकाळी 9.30 वा. आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जीर्णोद्धार समितीने केले आहे.

तळेरे गावठण येथील श्री. विठ्ठल रखुमाई मंदिर जीर्ण झाले होते. मुंबई स्थित ग्रामस्थ आणि गावातील ग्रामस्थ यांची संयुक्त सभा होऊन हे मंदिर बांधकाम करण्याचे ठरले. त्यानुसार हे मंदीर नवीन बांधकाम करावयाचे असून त्याचा भूमिपूजन सोहळा बुधवारी आयोजित करण्यात आलेला आहे. यावेळी गावातील आणि मुंबईस्थित ग्रामस्थ उपस्थित राहणार असून गावातील मानकरी यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. यावेळी पंचक्रोशीतील भाविक, वारकरी, ग्रामस्थांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री. विठ्ठल रखुमाई मंदिर जीर्णोद्धार समितीने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!