तळेरे येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन

तळेरे येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन

*कोंकण एक्सप्रेस*

*तळेरे येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन*

*कासार्डे प्रतिनाधी : संजय भोसले*

तळेरे येथील स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाचनालयातील विविध भाषेतील नवीन जुनी पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन तळेरे सरपंच हनुमंत तळेकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन तर डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला ट्रस्टचे उपाध्यक्ष चंद्रकांत तळेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष राजू वळंजू, उपाध्यक्ष शशांक तळेकर, सचिव मिनेश तळेकर, ट्रस्टचे निकेत पावसकर, वाचनालयाचे कार्यकारिणी सदस्य उदय दुधवडकर, विठोबा चव्हाण, ग्रंथपाल साक्षी तळेकर, नेत्रा पावसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचनालयात असलेली नवीन जुनी महत्वाची वेगवेगळ्या भाषेतील पुस्तके वाचकांना पहायला मिळावीत यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिनेश तळेकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!