शासकीय कार्यालयांत ‘आयडी कार्ड’ न लावल्यास पगार कापणार

शासकीय कार्यालयांत ‘आयडी कार्ड’ न लावल्यास पगार कापणार

*कोंकण एक्सप्रेस*

*शासकीय कार्यालयांत ‘आयडी कार्ड’ न लावल्यास पगार कापणार*

अनेकदा नागरिकांना शासकीय कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी कोण हे ओळखता येत नाही. त्यामुळे गैरसोयी, गोंधळ, आणि काही वेळा वादही होतात. या सर्वांवर आळा घालण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

ओळखपत्र लावणे आता बंधनकारक
राज्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयात काम करताना ID Card लावणे आवश्यक केले आहे.
I’d card न लावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.
तसेच, एका दिवसाचा पगार कापण्याचा इशारा शासनाने दिला आहे.

‘बाहेरच्यांची’ लुडबूड थांबवण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, आणि महापालिकेत कर्मचारी नसलेल्यांची वर्दळ असते.
त्यामुळे कोण कर्मचारी आणि कोण बाहेरून आलेला हे ओळखणे अवघड होते. त्यामुळे
Id card वापरल्याने अशा गोंधळाला आळा बसेल.

अर्थ’पूर्ण व्यवहारांवर नजर
महसूल, बांधकाम, आणि इतर विभागांमध्ये लाचखोरीच्या घटना वाढल्या आहेत.
अनेक वेळा कर्मचारी ओळखपत्र न लावता काम करत असल्याचे समोर येते.
आता प्रत्येक कर्मचाऱ्याने आपली ओळख स्पष्ट ठेवणे आवश्यक आहे.

काहीजण तर सोयीच्या वेळीच आयडी कार्ड लावतात बाहेर पडल्यावर ते पुन्हा खिशात ठेवतात.
शासनाने आता या सवयीवर पूर्णविराम दिला आहे.

नियमांकडे दुर्लक्ष आता चालणार नाही
अनेक कार्यालयांत अजूनही कर्मचारी विनाओळखपत्र फिरताना दिसतात.
पण आता जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व सरकारी विभागात ओळखपत्राशिवाय प्रवेश बंद करण्यात आला आहे.
नियमांचे पालन न करणाऱ्यांवर थेट कारवाई होईल.

शेवटचा निर्णय
“विना ओळखपत्र कर्मचारी कार्यालयात आढळल्यास, शिस्तभंगाची कारवाई व एका दिवसाचा पगार कपात करण्यात येईल,” असा शासनाचा स्पष्ट इशारा आहे.
म्हणजेच, आता शासकीय कार्यालयात काम करताना ‘आयडी कार्ड’ हा अनिवार्य ड्रेस कोड ठरणार आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!