*कोंकण एक्सप्रेस*
*माहिती उपसंचालक अर्चना गाडेकर – शंभरकर यांना कोल्हापूर विभागाच्या वतीने श्रद्धांजली*
*कोल्हापूर*
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पालघर जिल्हा माहिती अधिकारी तथा कोकण विभागाच्या प्रभारी उपसंचालक व प्रसिद्ध लेखिका अर्चना गाडेकर – शंभरकर यांना आज आज कोल्हापूर माहिती विभागाच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली.*
अर्चना गाडेकर – शंभरकर (वय 52) यांचे दीर्घ आजाराने 15 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई येथे निधन झाले. काल त्यांच्यावर मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
आजच्या श्रद्धांजली सभेला कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक प्रवीण टाके, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड, हिल रायडर्सचे प्रमोद पाटील, नृत्य दिग्दर्शक चंद्रकांत पाटील, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांच्यासह साहित्य पर्यावरण पर्यटन व पत्रकारीताक्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी माहिती अधिकारी फारूक बागवान यांनी त्यांच्या विभागातील व साहित्य क्षेत्रातील कार्यकर्तृत्वाची माहिती दिली. मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देवून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अपर्ण केली. कार्यक्रमात आभार सहायक संचालक (माहिती) वृषाली पाटील यांनी मानले.

