*कोंकण एक्सप्रेस*
*कुटुंबियांनी महिलांच्या मासिक पाळी दरम्यान योग्य उपाययोजना केल्यास सशक्त कुटुंब* :- डॉ. श्रीपत भोसले*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार महिलांना होणारे ४२ टक्के आजार हे त्यांच्या मासिक पाळीच्या दरम्यान योग्य काळजी न घेतल्याने होत आहेत. गेली अनेक वर्षें वापरण्यात येणार्या सॅनिटरी पॅड या प्लॅस्टिक कापड मिश्रीत निकृष्ट दर्जाहीन असतात. त्यावर उपाय म्हणून आम्ही विदेशी पॅडवर संशोधन करुन भारतातही २०१८ पासून पुर्णपणे प्लास्टिक विरहित कापडी आणि ७ पदर असलेली निगेटिव्ह आयन चिपसह स्वस्त अशी सॅनिटरी पॅड निर्माण केली आहेत. कुटुंबियांंनी महिला़ंच्या मासिक पाळी दरम्यान अशा सॅनिटरी पॅडचा वापर केल्यास स्वस्थ नारी सशक्त कुटुंब ही संकल्पना दृष्टी पंथास येईल, असा विश्वास सातारा, पुणे येथे कार्यरत डॉ. श्रीपत भोसले यांनी फोंडाघाट हायस्कूल मध्ये व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शतायुषी आयन आरोग्यवर्धक आणि प्रदुषण मुक्त विश्व या संस्थेच्या विद्यमानाने “स्वस्थ नारी सुखी कुटुंब” या नारी केअर उपक्रमांतर्गत फोंडाघाट हायस्कूल मध्ये प्रथमच शुभारंभ करण्यात आलेल्या “मासिक पाळीतील समस्या आणि उपाययोजना” या उपक्रमात डॉ. भोसले बोलत होते. यावेळी व्यासपिठावर शतायुषीचे अध्यक्ष डॉ. हनुमंत सावंत, प्रसिद्धी प्रमुख, ज्येष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण, हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रा. प्रसाद पारकर, सहशिक्षिका आर्या भोगले, स्नेहा रेवडेकर, दिक्षा पेडणेकर, साईली पवार, प्रतिभा बडे आणि ५ वी ते ९ वी वर्गांतील १५० हून अधिक विद्यार्थिंनी उपस्थित होत्या.
यावेळी डॉ. भोसले यांनी बाजारात गेली अनेक वर्षें मोठ्या कंपनींच्या उपलब्ध असलेल्या प्लॅस्टिक मिश्रित कापडाच्या निकृष्ट दर्जाहिन सॅनिटरी पॅड आणि त्यांच्या स्वतःच्या संस्थेने निर्माण केलेल्या सॅनिटरी पॅड याच्यामधिल फरकांबाबत प्रात्यक्षिक सादर केलीत. प्रात्यक्षिके पहाताच सहशिक्षिकांनी उत्स्फूर्तपणे आमच्या उभ्या आयुष्यात प्रथमच सॅनिटरी पॅड बाबतची शास्त्रीयदृष्ट्या माहिती मिळाली. आजवर आम्हीही वापरत असलेली सॅनिटरी पॅड ही स्त्रीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने किती निकृष्ट दर्जाची असल्याचे प्रथमच समजले. या पॅड मुळे किमान यापुढील विद्यार्थिनींसह महिलांना स्वस्थ आरोग्यदायक जीवन जगण्याची संधी मिळेल. काही विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे पुढे येऊन शिक्षिकांच्या प्रतिक्रियेला सहमती दर्शवून आमच्या शाळेमध्ये ही पॅड उपलब्ध करून देण्यात यावीत, अशी मागणी केली.
मुख्याध्यापक प्रसाद पारकर यांनी संस्थाध्यक्ष डॉ. सावंत यांच्याकडे हि पॅड उपलब्ध करण्यास पॅडची व्हिलेवाट करणारे यंत्र हायस्कूल आणि महाविद्यालयात उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी केली. तसेच जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, इंजिनिअरिंग महाविद्यालये, शासकिय निमशासकीय, खाजगी आस्थापना, तंत्र, कृषी, परिचारिका शिक्षण, महिला बचत गट आदी ठिकाणी अशाच प्रकारे प्रबोधनपद शास्त्रीय माहिती द्यावी, अशी सूचना केली.
डॉ. सावंत यांनी या उपक्रमाबाबत शास्त्रीय माहिती दिली. भाई चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.
शिक्षण संस्थेचे संस्थाध्यक्ष महेश उर्फ राजू सावंत, सरचिटणीस चंद्रशेखर लिंग्रज, संचालक रजंन नेरुरकर, सचिव संजय सावंत यांनी या उपक्रमाला सहकार्य केले.
दरम्यान अशाच प्रकारचा उपक्रम डॉ. भोसले यांनी पणदूर हायस्कूलमध्ये राबविला. यावेळीही मुख्याध्यापक प्रा. गावकर, समाज सेविका रिना सावंत, प्रवर्तक बंडू मुसळे, शाम सावंत आदी उपस्थित होते. तसेच ओरोस, कुडाळ येथे महिला बचत गटात हा उपक्रम राबविण्यात आला.
हा उपक्रम आयोजित इच्छित असणार्या संबधित शाळा, महाविद्यालये , बचत गट आदींनी डॉ. सावंत (९४२२३ ९२९५७) आणि भाई चव्हाण (९४२२३८१९९३) या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा.

