*कोकण Express*
*प्रगतिपथ एज्युकेशनल फाउंडेशन पुणे यांचे यांच्यावतीने सरस्वती हायस्कूल नांदगाव ,माध्यमिक प्रशालेला शैक्षणिक साहित्य प्रदान*
*दहा संगणक,दोन मायक्रोस्कोप,आणि एक प्रिंटर यांचा समावेश*
*खारेपाटण ः प्रतिनिधी*
प्रगतिपथ एज्युकेशनल फाउंडेशन पुणे यांचे यांच्यावतीने सरस्वती हायस्कूल नांदगाव या माध्यमिक प्रशालेला दहा संगणक, दोन मायक्रोस्कोप,आणि एक प्रिंटर आदी शैक्षणिक साधने भेट म्हणून देण्यात आले.नांदगाव सरस्वती हायस्कूलच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात प्रगतिपथ एज्युकेशनल फाउंडेशनचे मॅनेजर विनोद महाजन याच्या शुभहस्ते वरील शैक्षणिक साधने प्रशालेस प्रदान करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नागेश मोरये,प्रगतिपथ एज्युकेशनल फाउंडेशनचे मॅनेजर विनोद महाजन,वृशाली महाजन उपाध्यक्ष अंकुश डामरे,खजिनदार सुभाष बिडये,सदस्य सुनिल आंबेरकर,प्रशालेचे मुख्याध्यापक सुधीर तांबे,प्रशालेचे लिपिक सुनिल पारधिये,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी विनोद महाजन म्हणाले प्रगतिपथ एज्युकेशनल फाउंडेशन पुणे यांचे शैक्षणिक चळवळीत योगदान आहे.नांदगाव सारख्या ग्रामीण भागातिल शाळेला भेटवस्तू देताना होणारा आनंद अवर्णनीय असल्याचे सांखत कोरोना काळात आँनलाईन अभ्यासाला आलेले महत्व लक्षात घेउन दहा काॅंप्युटर, दोन मायक्रोस्कोप,आणि एक प्रिंटर असे साहित्य देण्यामागिल मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगितले.दरम्यान संस्थेचे अध्यक्ष नागेश मोरये यांनी पुण्याच्या संस्थेने केलेले योगदान आपण कायम लक्षात ठेउन संस्थेचे ऋणी असल्याचे सांगितले. मुख्याध्यापक सुधीर तांबे यांनी प्रगतीपथ एज्युकेशनल फाउडेशनने केलेल्या शैक्षणिक कार्याचे कॊतुक केले.नांदगाव हायस्कूलचे सर्व शिक्षक या शैक्षणिक साहित्याचा उपयोग मुलांच्या प्रगतीसाठी करतिल असे आश्वासन दिले.यावेळी महाजन यांचा शाल, श्रीफळ,व पुष्पगुच्छ देउन यथोचित सत्कार करण्यात आला.
केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सावंत व आभार सुधीर तांबे यांनी मानले.