*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत सर्व शिक्षकांसाठी आर्टिफिशियल इंटिलिजन्स ( AI ) प्रशिक्षण*
*कणकवली ः प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली , विद्यामंदिर प्राथमिक विभाग , विद्यामंदिर इंग्लिश मिडियम स्कूल या तिन्ही शाळेतील पासष्ट शिक्षक / शिक्षिका यांना आर्टिफिशियल इंटिलिजन्स AI चे आधुनिक तंत्र शिक्षण क्षेत्रात कसे वापरावे याचे प्रशिक्षण देण्यात आले जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा MKCL यांच्या प्रयत्नांतून शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आण्यासाठी कृत्रिम बुद्धीमता AI या आधुनिक तंत्राचा प्रभावी वापर कसा करावा आणि आजचे शिक्षण व पद्धती आत्याधुनिक कशी करावी यांचे प्रशिक्षण मधुरा कॅम्पुटरच्या संचालिका सौ रश्मी बाईत यांनी प्रात्यक्षिका सह सर्व शिक्षकांना AI चे प्रशिक्षण आपल्या बुद्धी कौशल्याने उदाहरणासह देवून AI क्षेत्रात कुशल बनविले . यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर यांनी AI तंत्रांचे शिक्षण पद्धतीत महत्व विषद केले पर्यवेक्षक श्री वणवे सरांनी प्रास्ताविक व स्वागत करून AI तंत्र शिक्षकांसाठी किती महत्वाचे आहे या विषयी मार्गदर्शन केले यावेळी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ करंबेळकर मॅडम इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ दिव्या सावंत मॅडम वसर्व शिक्षक / शिक्षिका उपस्थित होते

