*कोंकण एक्सप्रेस
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेमध्ये डॉ एपीजे अब्दूल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ एपीजे अब्दूल कलाम यांचा जन्म दिन वाचन प्रेरणा दिन म्हणून प्रशालेत अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला प्रशालेच्या ग्रंथालयातून निवडक वाचनिय पुस्तके तसेच चरित्र वाङ्मय बालवाङ्मय ग्रंथांचे प्रदर्शन शाळेच्या प्रवेश द्वारावर भव्य स्वरूपात मांडण्यात आले सकाळी शाळा भरत असतांना मुलांना घेऊन पालक शाळेत येतात त्याचवेळी पालकांसाठी ग्रंथ प्रदर्शन भरवून वाचन प्रेरणेचे महत्व या विषयी मार्गदर्शन करून शाळेतील ग्रंथालयातील पुस्तकांची प्रदर्शनात पालकांनी पहाणी केली काही पालक पुस्तके पाहून वाचन करण्यात गुंग झाले वाचन प्रेरणा दिनांचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या पालकांना वाचनासाठी प्रोत्साहन दिले जर पालकांनी वाचनाची अभिरूची जोपासली तरच मुलांपर्यंत वाचन क्षमता वाढू शकते हाच उद्देश ठेऊन प्रशालेच्या प्रवेश द्वारा लगतच सुंदर असे ग्रंथांचे प्रदर्शन भरवून वाचनाची गोडी सर्व पालक विद्यार्थी यांच्या पर्यंत पोहचविण्यासाठी ग्रंथपाल श्री एम डी पवार सर यांनी विशेष प्रयत्न करून वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा केला या वेळी डॉ एपीजे अब्दूल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी सुप्रसिद्ध डॉक्टर श्री पंडित तेली साहेब उपस्थित होते प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर यांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्व सांगून ग्रंथ प्रदर्शनाचा उद्देश समजून दिला पर्यवेक्षक श्री वणवे सरांनी वाचन प्रेरणा दिनाला शुभेच्छा दिल्या यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते

