*कोंकण एक्सप्रेस*
*लिनेसतर्फे प्रवाशी स्वागत फलकाचे अनावरण*
*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*
लिनेस क्लब ऑफ वेंगुर्लाच्यावतीने उभादांडा-वेंगुर्ला हद्दीवर प्रवाशांच्या स्वागताचा फलक लावण्यात आला आहे. या फलकाचे अनावरण लिनेस क्लबच्या डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट छाया ठक्कर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी लिनेस पास्ट मल्टिपल प्रेसिडेंट नलिनी पारेख, रिजन को ऑर्डिनेटर उर्मिला सावंत, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी पद्मजा वाड, वेंगुर्ला लिनेस क्लबच्या अध्यक्ष पल्लवी कामत, प्राची मणचेकर, निला यरनाळकर, हेमा गावसकर, अर्चना देसाई, मृण्मयी केरकर व राधिका सपकाळ उपस्थित होत्या.

