*कोंकण एक्सप्रेस*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विद्यापीठात कुमार. सर्वेश मधुसूदन खांबल पोष्टर पेंटिंग मद्धे प्रथम क्रमांक*
*दोडामार्ग/ शुभम गवस*
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विद्यापीठात कुमार. सर्वेश मधुसूदन खांबल पोष्टर पेंटिंग मद्धे प्रथम क्रमांक. नाशिक येथे झालेल्या ८ विभागाच्या स्पर्धा मधून रावसाहेब गोगाटे कॉलेज ऑफ कॉमर्स श्रीमती सरस्वती बाई गणशेट वाळके कोलेज ऑफ आर्ट्स संचलित दोडामार्ग अभ्यास्केंद्राचा विद्यार्थी प्रथम क्रमांक घेऊन यशश्वी झाला आहे. आणि जळगाव येथे होणाऱ्या इन्द्रधनुष या स्पर्धे साठी त्याची निवड झाली आहे. अभ्यासकेंद्राचे केंद्रसंयोजक श्री.प्रा. दशरथ विठ्ठल राजगोळकर यांनी त्याचे अभिनंदन केले आहे त्याला पुढील स्पर्धे साठी शुभेच्छादिल्या आहेत. या विद्यार्थ्याने अभ्यासकेंद्राचे तसेच आपल्या दोडामार्ग गावाचे तालुक्याचे नाव इंद्रधनुष्य स्पर्धे पर्यन पोचविले आहे.

