*कोंकण एक्सप्रेस*
*तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत देसाई स्कूलचे यश*
*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*
वेंगुर्ला तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये प्रि.एम.आर.देसाई स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. यात १४ वर्षाखालील गटात रिले स्पर्धेत मुलींच्या गटाने द्वितीय क्रमांक, थाळी फेक स्पर्धेत सांज गडेकर हिने व गोळा फेकमध्ये सुफियान शेख यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. १७ वर्षाखालील गटात १०० मीटर धावणे आणि गोळा फेक स्पर्धेत आरमान शेख याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या सर्वांची पुढील जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी निवड झाली आहे.

