वैभववाडी शहरात सॅनिटायझरची फवारणी

वैभववाडी शहरात सॅनिटायझरची फवारणी

*कोकण Express*

*वैभववाडी शहरात सॅनिटायझरची फवारणी…*

*नगरपंचायत व प्राणजीवन संस्थेचा पुढाकार…*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

बाजारपेठ व संपूर्ण शहरात आज सॅनिटायझर फवारणी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. वाभवे – वैभववाडी नगरपंचायत, प्राणजीवन सहयोगी संस्था शिरवल व सोसायटी फॉर इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट यांच्यावतीने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र कडक उपाययोजना करण्यात येत आहेत. शनिवार व रविवार दोन दिवस लाँकडाऊन जाहीर झाले आहे. वैभववाडी बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर वैभववाडीत आज फवारणी केली जात आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपक्रमाचे शहरवासीयामधून समाधान व्यक्त होत आहे. प्राणीजीवन सहयोग संस्था संस्थापक संदीप चौकेकर यांनी संपूर्ण तालुक्यात सॅनिटायझर फवारणी उपक्रम हाती घेतला आहे.
नगरपंचायतच्या आवारात या उपक्रमाचा आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, मुख्याधिकारी सुरज कांबळे, नगरसेवक संजय सावंत, व्यापारी मंडळ अध्यक्ष रत्नाकर कदम, प्राणजीवन संस्था प्रतिनिधी किशोर दळवी, श्री. ढवण, राजन तांबे, उत्तम निकम, भिकाजी लसणे, न.पं. कर्मचारी सचिन माईणकर, श्री. पवार, मदा इंदप, मंगेश तांबे, सुनील निकम, प्रवीण रावराणे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!