*कोंकण एक्सप्रेस*
*गणित संबोध परीक्षेत देसाई स्कूलचा निकाल १०० टक्के*
*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*
सिंधुदुर्ग गणित अध्यापक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत वेंगुर्ला येथे प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मीडियम स्कूलमधून बसलेले सर्वही विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला.
इयत्ता पाचवीमधून सैझीन शेख व इयत्ता आठवीमधून रोहित साठे यांनी स्कूलमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. सर्व विद्यार्थ्यांची गणित प्राविण्य परीक्षेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा.जयकुमार देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, चेअरमन डॉ.मंजिरी देसाई-मोरे, मुख्याध्यापक मिताली होडावडेकर यांसह शिक्षकवृंद व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे

