शिवसेना आंब्रड विभागप्रमुखपदी राजू घाडी,उपविभागप्रमुख पदी अणा मेस्त्री व अन्य पदाधिकाऱ्यांची निवड

शिवसेना आंब्रड विभागप्रमुखपदी राजू घाडी,उपविभागप्रमुख पदी अणा मेस्त्री व अन्य पदाधिकाऱ्यांची निवड

*कोंकण एक्सप्रेस*

*शिवसेना आंब्रड विभागप्रमुखपदी राजू घाडी,उपविभागप्रमुख पदी अणा मेस्त्री व अन्य पदाधिकाऱ्यांची निवड*

*मा.आ. वैभव नाईक यांनी आंब्रड विभागात बैठका घेत पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी साधला संवाद*

*कुडाळ : प्रतिनिधि*

आंब्रड जिल्हा परिषद विभागात माजी आमदार वैभव नाईक यांनी दौरा करत शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी आंब्रड, घोटगे, कुपवडे, सोनवडे येथे कार्यकर्त्यांची बैठक घेत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत करत सत्कार केला. याप्रसंगी आंब्रड विभागप्रमुख पदी राजू घाडी, उपविभागप्रमुख (आंब्रड) पदी अणा मेस्त्री, उपविभाग संघटकपदी मोहन घाडी-भरडकर, आंब्रड शाखाप्रमुख पदी संतोष ठाकर,सोनवडे युवासेना शाखाप्रमुखपदी सिद्धेश घाडी यांची नेमणूक करण्यात आली.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख सचिन कदम, उपतालुकाप्रमुख महेश सावंत, उपविभागप्रमुख पी.डी. सावंत,कुंदे सरपंच रुपेश तायशेटे,आंब्रड ग्रा. प. सदस्य सागर वाळके,माजी विभागप्रमुख दिनकर परब,घाटगे शाखाप्रमुख चंदन ढवळ, सोनवडे शाखाप्रमुख गुरु मेस्त्री, सुधीर भोसले, सुधीर नाईक, विरेश परब, जया परब, विजय परब,शेखर परब, रुपेश घाडी,बाबी टेमकर,सुधीर भोसले, जगदीश परब,अरविंद परब,दाजी परब,सोनू सावंत,शामा सावंत,अवी नाईक आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!