*कोकण Express*
*अखेर चाकरमान्यांची कणकवली रेल्वेस्टेशनवर तपासणी सुरू!*
*थर्मल गन, पल्स मीटर, आदीने तपासणीसह नोंद सुरु!*
*कणकवली ःःप्रतिनिधी*
कणकवली रेल्वे स्टेशनवर आज चाकरमान्यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी करिता चाकरमान्यांची कोणतीही तपासणी होत नसल्याचे त्याची संबंधित प्रशासनाने दखल घेत/ अखेर रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या चाकरमान्यांची थर्मल गन, ऑक्सिमीटर, आदीने तपासणीसह नाव नोंदनी सुरू केली आहे. तसेच होमगार्ड यांचाही चोख बंदोवस्त यावेळी करण्यात आला आहे.
दरम्यान, एकीकडे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी बाहेरील नागरिकांना कोव्हीड आरटीपीसीआर तपासणी करुनच प्रवेश देण्यात येईल, असा आदेश दिला आहे. परंतु, आह मिनी लॉकडाऊन असतानाच आज पासून हजारो चाकरमानी रेल्वेने जिल्ह्यात दाखल होत आहेत. आज कणकवली रेल्वे स्थानकावर दादर ते मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस आल्यावर चाकरमान्यांची मोठी गर्दी उसळली होती. त्यानंतर मांडवी एक्सप्रेस मधून आलेल्या चाकरमण्यांची तपासणी कणकवली रेल्वे स्टेशनवर प्रशासनाने सुरू केली. याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली यामुळे जनतेमधून समाधान व्यक्त होत आहे.