*सिंधुदुर्गात १४१ नवीन रूग्ण आढळले…*

*सिंधुदुर्गात १४१ नवीन रूग्ण आढळले…*

*कोकण Express*

*सिंधुदुर्गात १४१ नवीन रूग्ण आढळले…*

*आज आणखी तिघांचा कोरोनाने मृत्यू…*

*दोघे वैभववाडीतील, एक मालवणमधील महिला*

*सिंधुदुर्गनगरी,ता.१०:*

जिल्ह्यात आज कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. यात मालवण येथील ७८ वर्षीय महिलेसह वैभववाडी येथील दोघा वृध्दांचा समावेश आहे. दरम्यान आज नव्याने तब्बल १४१ नव्याने आढळून आले आहेत. याबाबत माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांकडून देण्यात आली आहे. वायरी-मालवण येथील ७८ वर्षीय महिलेचा आज कोरोनाने मृत्यू झाला आहे. तिला उच्चरक्तदाबाचा त्रास होता.
नाधवडे-वैभववाडी येथील ६० वर्षीय पुरुषाचा आज मृत्यू झाला आहे. त्यास  दमा, उच्चरक्तदाब व मधुमेहाचा आजार होता.
नानीवडे-वैभववाडी येथील ६५ वर्षीय पुरुषाचा आज मृत्यू झाला असून त्यास उच्चरक्तदाबाचा त्रास होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!