*लिनेसच्या नुतन पदाधिका-यांना शपथ प्रदान*

*लिनेसच्या नुतन पदाधिका-यांना शपथ प्रदान*

*कोंकण एक्सप्रेस*

*लिनेसच्या नुतन पदाधिका-यांना शपथ प्रदान*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

लिनेस क्लबच्या सिधुदुर्ग अध्यक्ष छाया ठक्कर आणि माजी अध्यक्ष नलिनी पारेख, प्रभाग समन्वयक उर्मिला सावंत, जिल्हा सेक्रेटरी पद्मजा वाड यांनी वेंगुर्ला येथील लिनेस क्लबला भेट देत आढावा घेतला.
शहरातील भाटीया हाऊस येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी मोना नाईक, श्वेता आरोसकर, राखी दाभोलकर, राधिका सकपाळ, मनाली कामत या नुतन पदाधिका-यांना नलिनी पारेख यांनी शपथ प्रदान केली. तसेच ए.पि.जे.अब्दुल कलाम स्कॉलरशिप मिळवून इस्त्रोमध्ये निवड झालेल्या विठ्ठल कोरगांवकर व प्राजक्ता भोकरे या मुलांना भेटवस्तू देऊन छाया ठक्कर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत लिनेस क्लब ऑफ वेंगुर्ल्याच्या अध्यक्षा पल्लवी कामत यांनी, स्वागत गीत मोना नाईक, मंदाकिनी सामंत व मृण्मयी केरकर यांनी सादर केले. प्रतिज्ञा वाचन निला यरनाळकर यांनी तर हेमा गावस्कर व कविता भाटीया यांनी अहवाल सादर केला आहे. पाहुण्यांची ओळख अर्चना देसाई व प्राची मणचेकर यांनी करून दिली. सूत्रसंचालन अॅड.सुषमा प्रभूखानोलकर यांनी तर आभार मोना नाईक यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंजली धुरी, दिशा कर्पे, बिना भाटीया यांनी परिश्रम घेतले.
फोटोओळी – वेंगुर्ला लिनेसतर्फे जिल्हा पदाधिका-यांचे स्वागत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!