पुन्हा एकदा संगीत क्षेत्रात सिंधुदुर्गाची बाजी

पुन्हा एकदा संगीत क्षेत्रात सिंधुदुर्गाची बाजी

*कोंकण एक्सप्रेस*

*पुन्हा एकदा संगीत क्षेत्रात सिंधुदुर्गाची बाजी*

*दाजीकाका गाडगीळ करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत चिन्मय सावंत आणि सुबोध मालंडकर यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत पुरस्कार*

*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले*

नुकत्याच पुणे येथे झालेल्या दाजीकाका गाडगीळ करंडक – राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२५ मध्ये सिंधुदुर्गातील संगीतकार जोडी चिन्मय सावंत (डामरे, कणकवली) आणि सुबोध मालंडकर (कुमामे, मालवण) यांनी ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत’ हा मानाचा किताब पटकावला.

कलांश थिएटर मुंबई निर्मित “मढ निघाला अनुदानाला” या एकांकिकेस परीक्षकांकडून उच्च दर्जाचे मानांकन मिळाले. सामाजिक आणि भावनिक वास्तवावर भाष्य करणाऱ्या या एकांकिकेला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद लाभली.

या स्पर्धेत कलांश थिएटर, मुंबई समूहाने अनेक विभागांत उल्लेखनीय यश मिळवत खालील पारितोषिके पटकावली –
उत्तेजनार्थ – कलांश थिएटर मुंबई
दिग्दर्शक उत्तेजनार्थ – महेश कापरेकर आणि सागर चव्हाण
सर्वोत्कृष्ट संगीत (प्रथम) – चिन्मय सावंत आणि सुबोध मालंडकर
सर्वोत्कृष्ट लेखक (द्वितीय) – प्रतीक चौधरी
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना – श्याम चव्हाण
अभिनेता उत्तेजनार्थ – प्रसेनजीत गायकवाड

या स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले, दिग्दर्शक योगेश शिरसाट आणि अभिनेत्री मुग्धा गोडबोले यांनी केले.

एकांकिकेतील प्रभावी मांडणी, ठसठशीत अभिनय तसेच संगीतकार जोडीनं दिलेल्या सूक्ष्म आणि भावस्पर्शी पार्श्वसंगीतामुळे या सादरीकरणाने स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

यापूर्वी आय.एन.टी. हिंदी आणि आय.एन.टी. मराठी या दोन्ही स्पर्धांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट संगीत’ पारितोषिक पटकावलेल्या या संगीतकार जोडीनं आता दाजीकाका गाडगीळ करंडक मध्येही आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!