*कोंकण एक्सप्रेस*
*जगामध्ये शांती हवी असेल तर प्रथम गावा मधील तंटे मिटले पाहीजेत:- जयप्रकाश परब*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
कासार्डे तंटामुक्ती समितीच्या वतीने निंबध स्पर्धा आयोजित करून पहिल्यांदाच असा उपक्रम झाला हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे.यामुळे विद्यार्थांना विचार मांडण्यासाठी व्यासपीठ मिळाले आहे. जगामध्ये शांती निर्माण व्हायची असेल तर गावातील तंटे मिटले पाहिजेत असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यानी केले.ते महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती कासार्डे व ग्रामपंचायत कासार्डे याच्या वतीने घेण्यात आलेल्या निंबध स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभात ग्रामपंचायत कासार्डेच्या सभागृहात बोलत होते.
तत्पूर्वी दिपप्रज्वलन जयप्रकाश परब याच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळेस कणकवली पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे,सरपंच निशा नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे,तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश उर्फ बाबू तिर्लोटकर,माजी जि.प.सदस्य संजय देसाई,सुप्रिया पाताडे, माजी उपसभापती प्रकाश पारकर,शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र नारकर, सोसायटी चेअरमन दिपक सावंत,खरेदी विक्री संघाचे संचालक श्रीपत पाताडे, माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीरंग पाताडे, संतोष सावंत, केंद्र प्रमुख संजय पवार, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद पाताडे,विजय राणे, प्रणय जोशी,श्वेता चव्हाण, विस्तार अधिकारी अडुळकर, कोतवाल आरेकर,अतुल सावंत, अमोल जमदाडे, कासार्डे आऊट पोस्ट ठाणे अंमलदार चंद्रकांत झोरे,सर्व पोलीस पाटील,कासार्डे केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होते.
पुढे बोलताना परब म्हणाले, तंटे निर्माण कारायचे नाहीत ही भावना समाजात रूजवली पाहीजे त्याची सुरवात आज कासार्डे गावाने केली आहे.विद्यार्थी हा देशाचा भावी आदर्श आहे.यासाठी निर्माण होणा-या प्रत्येक तंत्रज्ञानाचा काळजीपूर्वक वापर करावा.आपली सद्बुद्धी विवेक बुद्धी जागृत करून समाजात वागावे ही भूमिका प्रत्येकाने ठेवली पाहीजे. त्याचबरोबर कासार्डे गाव एक शांत गाव अशी प्रतिमा जिल्ह्यात व राज्यात झाली पाहीजे. तर महेश शेंडगे यानी तंटामुक्त समितीकडून नाविन्यपूर्ण उपक्रम घेतला याचे कौतुक आहे. कोकणातील स्पर्धा परीक्षेचा टक्का म्हणावा तेवढा नाही यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असून एआयचा वापर कसा करायचा आहे आपण ठरवले पाहीजे. सोशल मीडियावर विद्यार्थ्यांनी मित्र बनविताना काळजी घेतली पाहिजे असे सांगत निंबध स्पर्धेतील विचार समाजात घडवण्यासाठी उपयोगी पडले पाहीजेत.
यावेळेस निशा नकाशे,प्रकाश पारकर, संजय पवार, मृदुला मिलिंद पाताडे यानी मनोगत व्यक्त केले.या निंबध स्पर्धेत उच्च माध्यमिक गटात प्रथम कु.वेदिका तेली, व्दितीय कु. सलमा नावलेकर,तृतीय कु. मुदृला पाताडे,उत्तेजणार्थ कु. वैष्णवी घाडी, रोहिणी सोमले,माध्यमिक गटात प्रथम कु.अव्दिता पोकळे,व्दितीय कु. वैदेही पाताडे, तृतीय कु.मनिषा पालव, उत्तेजणार्थ गुरूप्रसाद पाटील,कु. मृग्धा पाताडे व प्राथमिक गटात प्रथम कु.मधु सर्वेशकुमार प्रजापती,व्दितीय कु.गौरांग रणदिप शेलार,तृतीय अर्णव राजेंद्र राणे,उत्तेजणार्थ समृद्धी मनोहर मराठे, प्रणिती विश्वनाथ सावंत यानी यश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह , प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जाकिर शेख व आभार प्रकाश तिर्लोटकर यानी मानले.

