शिरगांव येथील पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयात ‘मराठी अभिजात भाषा सन्मान सप्ताह’ उत्साहात साजरा

शिरगांव येथील पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयात ‘मराठी अभिजात भाषा सन्मान सप्ताह’ उत्साहात साजरा

*कोंकण एक्सप्रेस*

*शिरगांव येथील पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयात ‘मराठी अभिजात भाषा सन्मान सप्ताह’ उत्साहात साजरा*

*शिरगाव : संतोष साळसकर*

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार ३ ते ९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मराठी अभिजात भाषा सन्मान सप्ताह’ शिरगाव पंचक्रोशी (ता. देवगड) शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालय, शिरगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या सप्ताहांत मराठी विभाग व मराठी वाङ्मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, अभिजात मराठी भाषेवरील भित्तिपत्रक सादरीकरण, प्रश्नमंजुषा, भाषिक खेळ तसेच ‘अभिजात मराठी’विषयक माहितीपर पॉडकास्ट अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. समीर तारी यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे अभिजातपण जपण्याचे व तिच्या सन्मानासाठी सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले. “अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना सृजनशील अभिव्यक्तीची संधी मिळते,” असेही त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे चेअरमन मा. श्री. संभाजी साटम, अधीक्षक श्री. सुधीर साटम, मराठी विभाग प्रमुख प्रा. सिद्धी कदम, तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमांना विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!