चाकरमान्यांची कणकवली रेल्वेस्टेशनवर मोठी गर्दी

चाकरमान्यांची कणकवली रेल्वेस्टेशनवर मोठी गर्दी

*कोकण Express*

*चाकरमान्यांची कणकवली रेल्वेस्टेशनवर मोठी गर्दी!*

*कोव्हीड आरटीपीसीआर  तपासणी विना प्रवेश ; कोव्हीड संसर्ग फैलावण्याची भीती!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली रेल्वेस्टेशनला शनिवारी चाकरमान्याची मोठी गर्दी होती. एकीकडे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी बाहेरील नागरिकांना कोव्हीड आर्टिपीसीआर तपासणी करुनच प्रवेश देण्यात येईल, असा आदेश दिला आहे. परंतु, शनिवारी मिनी लॉकडाऊन असताना हजारो चाकरमानी रेल्वेने जिल्ह्यात दाखल होत आहेत. आज कणकवली रेल्वे स्थानकावर दादर ते मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस आल्यावर चाकरमान्यांची मोठी गर्दी उसळली होती.

त्या चाकरमान्यांची ना तपासणी, ना नोंद, ना आरटीपीसीआर टेस्ट करिता अधिकारी व प्रशासन अधिकारी उपस्थित नव्हते.

त्यामुळे कोव्हीड नियमांची पायमल्ली होताना दिसत होती.भविष्यात अश्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात कोव्हीड संसर्ग फैलाव मोठ्या प्रमाणात होण्याची भीती आहे.तर रिक्षा व्यवसायिकांना एकीकडे दोन पॅंसेंजर घेवून प्रवासाला परवानगी असून त्या प्रवासी ग्राहकडे रेल्वे तिकीट असणे गरजेचे आहे असे सांगण्यात आले होते.

मात्र काही ठिकाणी पोलीस अडवणूक करत असल्याने प्रवासी व रिक्षा चालकामधून नाराजीचा सूर उमटत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!