*कोंकण एक्सप्रेस*
*आर्या सावंत एसबीआय शिष्यवृत्ती धारक*
*कनेडी- वार्ताहर*
एसबीआय शिष्यवृत्ती योजना म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया द्वारे चालवली जाणारी एसबीआय शिष्यवृत्ती हा एक उपक्रम आहे. ज्याद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. या शिष्यवृत्ती योजनेसाठी इयत्ता नववी पासून ते पदव्युत्तर स्तरापर्यंत चे विद्यार्थी अर्ज करू शकतात. मागील शैक्षणिक वर्षात किमान ७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणारे विद्यार्थी यासाठी पात्र ठरू शकतात.
माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेची इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांनी कु.आर्या प्रदीप सावंत या आदर्श व गुणवंत धारक विद्यार्थिनीला यावर्षीची एसबीआय शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळालेला असून तीच्या या सुयशा बद्दल कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. सतीशजी सावंत साहेब, सर्व संचालक मंडळ, शालेय समिती चेअरमन श्री.आर.एच.सावंत, सर्व सदस्य तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक श्री. बयाजी बुराण, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी तीचे विशेष अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

