कणकवली नगराध्यक्ष पदासाठी नागरिक मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) राखीव

कणकवली नगराध्यक्ष पदासाठी नागरिक मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) राखीव

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवली नगराध्यक्ष पदासाठी नागरिक मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) राखीव*

*८ ऑक्टोबर रोजी नगरसेवक पदांच्या आरक्षणाची सोडत जाहीर होणार*

*कणकवली ः प्रतिनिधी*

राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत आज मंत्रालयात जाहीर करण्यात आली. सिंधुदुर्गातील कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी नागरिक मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) हे आरक्षण निश्चित झाले आहे. गेली तीन वर्षे नगरपंचायतीवर प्रशासकीय राजवट होती. आता पुन्हा नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू होणार आहे. दरम्यान, ८ ऑक्टोबर रोजी नगरसेवक पदांच्या आरक्षणाची सोडत जाहीर होणार असून, त्यामुळे लवकरच नगरपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!