सिंधुदुर्गातील पत्रकार भावनाचे स्वप्न लवकरच पूर्ण

सिंधुदुर्गातील पत्रकार भावनाचे स्वप्न लवकरच पूर्ण

*कोकण Express*

*सिंधुदुर्गातील पत्रकार भावनाचे स्वप्न लवकरच पूर्ण*

*पत्रकार भवनासाठी 1 कोटी 55 लाखाचा निधी प्राप्त*

*सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे*

*सिंधुदुर्ग*

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जन्मभूमी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुनगरी येथे त्यांचे स्मारक व पत्रकार भवन करण्याचे जिल्ह्यातील पत्रकारांचे आणि महाराष्ट्रातील मराठी पत्रकारांचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे या भवनाचे बांधकाम पूर्ण झाले असून फर्निचर आणि सुशोभीकरणासाठी आवश्यक असणारा 1 कोटी 55 लाख रुपयांचा निधी राज्य शासनाकडून प्राप्त झाल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश घाटे यांनी दिली.
पत्रकार भवनासाठी चार कोटी 55 लाखाच्या निधीला मंजुरी मिळाली होती त्यातील तीन कोटीचा निधी प्राप्त झाला होता. यातून भवनाचे इमारतीचे बांधकाम रंगकाम आणि विद्युतीकरण व साउंड सिस्टम चे काम तसेच बांधकाम व रंग काम पूर्ण झाले आहे. विद्युतीकरण आणि साउंड सिस्टम चे काम सध्या सुरू आहे. अद्यापही फर्निचर आणि इतर कामासाठी 1 कोटी 55 लाख रुपयांचा जो शिल्लक येणे निधी होता तो प्राप्त होणे आवश्यक होते. त्यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख विश्वस्त किरण नाईक आणि अध्यक्ष गजानन नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू होते आम्ही उपाध्यक्ष रमेश जोगळे बाळा खडपकर यांच्यासह जिल्हा पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री उदय सामंत ,आमदार दीपक केसरकर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची मुंबईत भेट घेऊन निधी मिळण्याची मागणी केली. पालकमंत्र्यांनी ग्रामविकास खात्याकडे निधीच्या मागणीचा प्रस्ताव सादर केला होता त्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी मोठी मदत केली ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी आमची भेट घालून दिली तसेच आमची मागणी वित्तमंत्री अजित पवार यांच्यामार्फत पोहोचविली विशेष म्हणजे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधवळे आणि अभियंता विनायक जोशी यांनीही प्रस्ताव परिपूर्ण ते साठी सहकार्य केले.

आता हा मिळालेला निधी कोषागर कार्यालयाकडे असून तो लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहे त्यानंतर लगेचच तांत्रिक मान्यता घेऊन पुढील कामाची निविदा काढण्यात येणार आहे त्यासाठी सनियंत्रण समितीची बैठक बोलविण्यात येणार असून त्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे येत्या काही महिन्यात हे काम पूर्ण होऊन सिंधुदुर्गातील पत्रकारांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!